रत्नागिरीतून ८०० भाविकांना घेऊन अयोध्येसाठी तीर्थ दर्शन ट्रेन रवाना!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • पालकमंत्री उदय सामंत यांनी दाखवला हिरवा झेंडा

रत्नागिरी : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकातून कोकणातील पहिली रेल्वे ८०० ज्येष्ठ नागरिकांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर रवाना झाली. रेल्वेमार्फत या धार्मिक यात्रा स्पेशल ट्रेनला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी हिरवा झेंडा दाखवला.

रत्नागिरी रेल्वे स्थानकातून अयोध्येसाठी सोडण्यात आलेल्या तीर्थ दर्शन ट्रेनचा शुभारंभ करताना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत.

शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिशय महत्वकांक्षी योजना जेष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आली होती. या योजनेचा फायदा माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांना मिळत असल्याचा अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रियांना उदय सामंत यांनी व्यक्त केली.

या यात्रेदरम्यान माझ्या ज्येष्ठ वडिलधाऱ्या नागरिकांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना यावेळी करून हव्या त्या उपाययोजना माझ्यावतीने केल्या जातील अशी ग्वाही त्यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जनसंपर्क अधिकारी संजय भोसले, पर्यटन सहाय्यक व्यवस्थापक संजय शर्मा, टूर मॅनेजर लोकेश यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष बंडयाशेठ साळवी, रत्नागिरी शिवसेना शहरप्रमुख बिपीन व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment