करळ पुलावर टँकर उलटून गॅस गळती

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि. १९ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील करळ/ सोनारी ब्रिजवर गॅस टँकरला अवघड वळणावर १९ मे रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी, लाखो रुपयाची गॅस गळती झाली असून गॅसचे धूर गावांमध्ये २ ते ३ किलोमीटरवर पसरले. रस्ता वाहतुकीसाठी बंद  करावा लागला.

घटनास्थळी उरण पोलीस स्टेशन, न्हावा शेवा पोलीस स्टेशन आणि वाहतूक पोलीस अधिकारी पोचले असुन पुढील तपास करीत आहेत. बीपीसीएल रेस्क्यू टीम, सिडको अग्निशमन, जेएनपीटी अग्निशमन, ट्रॅफिक विभागाचे डीसीपी तिरुपती काकडे, ट्रॅफिक विभागाचे एसीपी विठ्ठल कुबडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे, न्हावा शेवा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक मुजावर,गव्हाण फाटा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक बदगुजर आदी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपघात ठिकाणी पाहणी केली.

वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment