Mumbai-Goa Highway | ठेकेदाराच्या कामाची पहिल्याच पावसात पोलखोल!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • महिनाभरातच गटारावरील स्लॅब गेला पडून!
  • महामार्गावरील आरवली येथील गटाराची अवस्था

आरवली : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (NH 66) ठेकेदार कंपनीच्या कामाची गुणवत्ता पावसाने दाखवून दिली आहे. आरवली येथील सर्व्हिस रोड लगत महिनाभरापूर्वी बांधण्यात आलेल्या गटारावरील स्लॅब पडून गेला आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील उड्डाणपुलालगत दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड तयार करण्यात आले आहेत. यातील एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण पूर्ण होऊन बाजूला गटारही बांधण्यात आले आहे. मात्र, हे काम पूर्ण होऊन जेमतेम महिना दीड महिना उलटतो तोच पहिल्याच पावसात गटारावरील स्लॅब वाहून गेला आहे. बाजारपेठेतील पूर्वेकडच्या बाजूच्या सर्व्हिस रोडवरील गटाराची पहिल्याच पावसात अशा प्रकारे पोलखोल झाली आहे.

अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे. सध्या पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसातच महिनाभरापूर्वी बांधलेल्या गटाराची ही अवस्था झाली असेल तर ऐन पावसाळ्यात काय होईल, याची कल्पना येऊ लागली आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment