रत्नागिरीचे नूतन पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पदभार स्वीकारला

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची पदोन्नतीसह बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती झालेले नितीन बगाटे यांनी आपल्या पदाचा कार्यभार शनिवारी स्वीकारला. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी नव्या पोलीस अधीक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक ‌‌धनंजय कुलकर्णी यांची बढती मिळाल्याने मुंबई येथे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली.

त्यांच्या जागी नितीन बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे..रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नितीन बगाटे यांच्या नियुक्तीमुळे जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध गतिविधींवर नियंत्रण ठेवण्यासाठी होईल, अशी अपेक्षा आहे.

रत्नागिरीतील जिल्हात वाढत असणारा अवैध अंमली पदार्थांचा व्यापार समुळ नष्ट करण्याचे मोठे आव्हान बगाटे यांच्यासमोर असणार आहे. बगाटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक प्रभावी व कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment