गोपाळगडावरील बेकायदा बांधकाम जेसीबीने हटवले

Team RatnagiriLive
1 Min Read

गुहागर : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्यावर जागा मालकाने केलेले अनधिकृत बांधकाम पुरातत्व विभाग रत्नागिरीने शनिवारी जमिनदोस्त केले.
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेल्या गोपाळगडावर तेथील जागा मालकाने गेल्या वर्षी अनधिकृत बांधकाम केले होते. हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे आदेश नगर रचनाकार विभागाने तहसील विभागाला दिले होते.

या आदेशा विरोधात जागामालक युनूस मणियार मुंबई हायकोर्टमध्ये अपिलात गेले होते. तेथे चाललेल्या दाव्यामध्ये पुरातत्व विभागाच्या बाजूने निकाल लागल्याने पुरातत्व विभागाने हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची नोटीस जागा मालकाला दिली होती. मात्र,जागामालकाने बांधकाम काढून न टाकल्याने अखेर शनिवारी पुरातत्व विभाग रत्नागिरीचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोपाळगडावरील एक दुकान, घर, एक स्टोरेज टँक, दोन वॉशरूम आणि आंबे ठेवण्यासाठी उभारण्यात आलेली चिरेबंदी शेड हे अवैध बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment