खैर प्रजातीच्या रोपांचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना शनिवारी मोफत वाटप

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी, दि. ३ : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते चिपळूण येथे मोफत वाटप होणार आहे.

शनिवार ५ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते ११.३० वाजता चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात वन वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्रमही होणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग रणजित गायकवाड आणि विभागीय वन अधिकारी (प्रा.) गिरिजा देसाई यांनी दिली.

यावेळी गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे हे अतिथी उपस्थित राहणार आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment