मतदान दिवशी आठवडा बाजार बंद

Team RatnagiriLive
1 Min Read
  • लांजा हद्दीतील बाजार १ डिसेंबर रोजी

रत्नागिरी, दि.25 : मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी मतदान दिवशी रत्नागिरी नगर परिषद व लांजा नगरपंचायत हद्दीतील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या ठिकाणी बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 (ग) मधील क तरतुदीनुसार रत्नागिरी नगरपरिषद हद्दीमधील नाचणे आठवडा बाजार बंद करण्यास व बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 नुसार लांजा नगरपंचायत हद्दीतील लांजा आठवडा बाजार दि. 1 डिसेंबर 2025 रोजी भरविण्याकरिता जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी आदेश दिले आहेत.


नगर परिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या कार्यक्रमानुसार दि.2 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी मतदान दिवशी रत्नागिरी नगरपरिषद व लांजा नगरपंचायत हद्दीतील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीपणे पार पाडावे. याकरिता बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 (ग) मधील क तरतूदीनुसार रत्नागिरी नगरपरिषद हद्दीमधील नाचणे आठवडा बाजार बंद करण्यास व बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 नुसार लांजा नगरपंचायत हद्दीतील लांजा आठवडा बाजार दि. 1 डिसेंबर 2025 रोजी भरविण्याकरिता जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी आदेश दिले आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment