नवोदय विद्यालयासाठी १३ डिसेंबरला प्रवेश परीक्षा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 दिनांक 13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका मुख्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत होणार आहे.

प्रवेश परीक्षेसाठी  विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेऊन परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 वाजता आपली उपस्थिती नोंदवावी. प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.बसवराज यांनी कळविले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment