पेण-कोल्हापूर, अलिबाग-कोल्हापूर एस टी बसेसना मार्ग फलक भेट

Team RatnagiriLive
1 Min Read

अलिबाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रायगड विभागाकडून दिवाळीसाठी पेण-कोल्हापूर तसेच अलिबाग- कोल्हापूर या ज्यादा एसटी बसेस दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाल्या.

पेण आगारातून सुरू झालेल्या पेण – कोल्हापूर आणि अलिबाग – कोल्हापूर जादा बसेसना ‘ आम्ही रायगडकर लाल परी प्रेमी गृप’कडून मार्गफलक देण्यात आले आणि हार लावून गाडी मार्गस्थ करण्यात आली.

या प्रसंगी गाडीचे चालक, वाहक, पेण आगाराचे वाहन निरीक्षक श्री. बांगर तसेच एसटी प्रेमी हेमंत पाटील , कौस्तुभ मोकल आणि आदित्य भगत हे उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment