रत्नागिरी ६ जानेवारीपासून बाल महोत्सव

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी, दि. 30 : बालकांसाठी दि. 6 ते 8 जानेवारी 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, मारुती मंदिर येथे बाल महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ निराधार उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वावर देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित करण्यात येतो. या बाल महोत्सवात संस्थाबाह्य (नगर परिषद शाळांमधील) मुलेही सहभागी होणार आहेत.

बाल महोत्सवात क्रिकेट, खोखो, कबड्डी, गोळाफेक, लांब उडी, 100 मीटर धावणे, 4 X 100 मीटर रिले, कॅरम, बुध्दीबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर वक्तृत्व अशा क्रिडा स्पर्धा तसेच सामूहिक नृत्य, सामुहीक गायन, नाटीका, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गायन इ. सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment