सावंतवाडी, दि. २४ : रक्तदान हे अत्यंत पवित्र आणि सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य असून, गरजू रुग्णांना थेट जीवनदान देण्याचे श्रेष्ठ माध्यम आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानाबाबत जनजागृती करून नियमितपणे या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले.
घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी पोलीस, डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब, ओंकार कलामंच आणि श्री औदुंबर स्वामी मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावणारे डॉ. अरविंद खानोलकर यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सावंतवाडी परिसरात वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. खानोलकर यांचे योगदान मोठे असून, त्यांच्या कार्याचा वारसा कुटुंबीयांनी पुढे न्यावा, असे आवाहन केसरकर यांनी केले.
रक्तदान हे रुग्णाला जीवदान देण्याचे श्रेष्ठ माध्यम : आ. दीपक केसरकर
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment
Leave a Comment
