ना. उदय सामंत यांच्या हस्ते उद्या मिरजोळेतील विकास कामांचे भूमिपूजन व उद् घाटन

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मिरजोळे गावातील सर्व विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन मंगळवार दि.४ एप्रिल २०२३ रोजी दुपारी कारण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत हे मंगळवारी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय मिरजोळे येथील हॉलमध्ये दुपारी ३ वाजता येणार आहेत. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. विकास कामाच्या भूमिपूजन व उदघाटन कार्यक्रमाना ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment