सावधान…!
बालविवाह कायद्याने गुन्हा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी :  बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे.  भारतात बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ हा कायदा करण्यात आला आहे. दि.१ नोव्हेंबर २००७ पासून हा कायदा अमलात आला. बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. सामाजिक स्वास्थ्यावर याचा दूरगामी परिणाम दिसून येतो.

कायद्यानुसार मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण नसेल व मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण नसेल आणि विवाह झाला असेल तर तो बालविवाह ठरतो. राज्यात अक्षयतृतीया हा सण शुभमुहूर्त मानला जातो आणि या मुहूर्तावर बहुतांश बालविवाह केले जातात. बालविवाह केल्यास कायद्यानुसार एक लाख रूपये दंड आणि दोन वर्षापर्यंत सक्तमजूरीची शिक्षा होऊ शकते. बालविवाह झाल्यास नातेवाईक, बालविवाह झालेल्या जागेचे मालक, बालविवाह लावून देणारे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.  


दि.22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होत असल्यास ग्रामसेवक, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जवळचे पोलीस स्टेशन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईन (१०९८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  आर. बी. काटकर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृध्दी अजय वीर यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment