ओरिसातील भीषण रेल्वे दुर्घटनेमुळे मडगाव-मुंबई एक्सप्रेसचे उद्याचे उद्घाटन रद्द

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्या दिनांक 3 जून रोजी होणारे उद्घाटन ओरिसा मधील भीषण रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहे. ओरिसामध्ये बालासोर जिल्ह्यात झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या भीषण रेल्वे दुर्घटनेत शेकडो प्रवाशांचे प्राण गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिराने ही दुर्घटना घडली.

गोव्यात मडगाव स्टेशनवर मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवला जाणार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन होणार होते. मात्र रेल्वे दुर्घटनेनंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment