जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कार्यशाळा

Team RatnagiriLive
1 Min Read


गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस सुविधेचा वापर परिणामकारक -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह


रत्नागिरी : शासकीय विभागांमध्ये पारदर्शकपणे खरेदी व्हावी, यासाठी गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस अर्थात जीइएम पोर्टल ही सुविधा अधिक परिणामकारक आहे. त्याचा वापर वाढवा, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.


येथील अल्पबचत सभागृहात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस अर्थात जीईएम बाबत कार्यशाळा आज झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी मार्गदर्शन करताना, खरेदीदार आणि विक्रेता या दोघंनाही यापुढे ओ एन डी सी धोरणाच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. अशा भारतीय प्रणाली मध्ये इतर देश स्वारस्य घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जीईएम पोर्टावरील नोंदणी कशी करावी, त्यावरील खरेदीची प्रकिया, तुलनात्मक वाजवी दर, सेवा क्षेत्राची सुविधा याबाबतची माहिती निखील पाटील, निलेश चौधरी यांनी संगणकीय सादरीकरणातून दिली. यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे निरसन ही त्यांनी केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment