निरामय योगा संस्था रत्नागिरीतर्फे दर रविवारी मोफत योग शिबिर

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरीतील निरामय योगा संस्था, पतंजलीचे मुख्य योग प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक विरू स्वामी सर यांच्यातर्फे दर रविवारी पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत शहरानजीकच्या भाटे समुद्रकिनारी झरी विनायक मंदिर येथे नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

नाडी परीक्षण करून सर्व आजाराचे निदान करणे, रोगानुसार योग प्रशिक्षण, अग्नि, वायू, आकाश, पृथ्वी, जल या पंचतत्त्वाच्या सान्नीध्यात योग करण्याचा सुवर्ण लाभ, सर्व वयोगटासाठी विशेष मार्गदर्शन अशी या शिबिराची खास वैशिष्ट्ये आहेत.

या योग शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करिता 9028899412 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पतंजलीचे रत्नागिरी येथील मुख्य योग प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक श्री विरू स्वामी सर यांनी केले आहे.

शिबिरात सहभाग घेणाऱ्यांनी येताना आपल्या सोबत योगा मॅट किंवा सतरंजी अशी बैठक व्यवस्था घेऊन येणे गरजेचे आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment