मुंबईतून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी चिपळूण स्थानकाच्या पश्चिम दिशेकडून बससेवा

Team RatnagiriLive
1 Min Read

चिपळूण : येथील एसटी आगारामार्फत प्रवाशांच्या मागणीनुसार चिपळूण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस (गांधारेश्वर मंदिर) ते चिपळूण शहरात मध्यवर्ती बस स्थानकापर्यंत येणारी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

चिंचनाका, वेस मारुती मंदिर, पवन तलाव, मुरादपूर, गांधारेश्वर मार्गे पश्चिम रेल्वे स्टेशन येथे मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांकरिता जाणार असून त्याच मार्गाने ती रेल्वे प्रवाशांना घेऊन शहरात येईल.

तिकीट दर १०/-
तिकीट दर महिलांसाठी ०५/-


दादर ते सावंतवाडी मार्गावर धावणारी तुतारी एक्सप्रेस (११००३), मुंबई सीएसएमटी ते मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५१), दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस (१०१०५)
मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६१९), दिवा -रत्नागिरी पॅसेंजर (५०१०३)

मुंबई, बोरिवली, ठाणे, कल्याण, पनवेलहून येणाऱ्या प्रवाशांनी या रा. प. बस सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment