रत्नागिरीत कोकणनगर येथे १८ जानेवारीला इज्तिमाचे आयोजन

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे ख्वाजा ग़रीब नवाज़ उर्स निमित्त रत्नागिरी कोकण नगर फैजाने अत्तार येथे इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा इज्तिमा गुरुवार दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी रात्री ९ वाजता सुरू होईल. इज्तिमासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे करण्यात आले आहे.

इज्तिमा नंतर सर्व मुस्लिम बांधवांना नियाजचे वाटप करण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment