कोकण रेल्वे मार्गे प्रवास करताय तर उद्याच्या ब्लॉकविषयी माहिती असू द्या

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दिवशी मेगा ब्लॉक चालणार्‍या भागातून जाणार्‍या लांब पल्ल्याच्या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सावर्डे ते रत्नागिरी स्थानकादरम्यान दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 ते 9.30 या यावेळेत अडीच तास मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे एर्नाकुलम ते हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस (12617) ही दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी प्रवास होणारी दैनंदिन लांब पल्ल्याची गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान 1 तास 45 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.

याचबरोबर तिरुनेलवेली ते गाधीधाम दरम्यान धावणारी (20923) ही 22 रोजी प्रवास सुरु होणारी आणि 23 फेब्रुवारीला मेगा ब्लॉक चालणार्‍या भागातून जाणारी गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान 1 तास 10 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.

हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून

Konkan Railway | आंगणेवाडी यात्रेसाठी १ मार्चपासून विशेष गाड्या

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment