सिंधुदुर्गात आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या भाविकांना रेल्वेची खुशखबर!

Team RatnagiriLive
1 Min Read

आंगणेवाडी यात्रेसाठी १ मार्चपासून विशेष गाड्या

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वे मार्गावर दिनांक एक मार्च 2024 पासून विशेष फेऱ्या जाहीर करण्यात आले आहेत.
सिंधुदुर्गातील आंगणेवाडी यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचे नियोजन दरवर्षी केले जाते. यावर्षी दिनांक १ मार्च 2024 रोजी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून आंगणेवाडीसाठी 01043/01044 ही गाडी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता तीन गोव्यात करमाळी ला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी दिनांक 3 मार्च 2024 रोजी दुपारी ३ वाजून 25 मिनिटांनी सुटेल आणि सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी पहाटे तीन वाजून 45 मिनिटांनी ती मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचेल.

हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून

आंगणेवाडी स्पेशल गाडीचे थांबे

ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी.

आंगणेवाडी यात्रेसाठी जाहीर करण्यात आलेली ही पहिली गाडी 22 डब्यांची एल एच बी गाडी असेल.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment