कोकण रेल्वे मार्गावरील आणखी एका एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवल्या

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : कोकणातून होळी उत्सव आटोपून परतीला लागलेल्या प्रवाशांच्या गर्दीमुळे उधना ते मंगळूरु या विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आले आहेत.

या संदर्भात कोकण रेल्वे माहितीनुसार उधना ते मंगळुरू या मार्गावर होळीसाठी जाहीर करण्यात आलेली विशेष गाडी (09057) आता दिनांक 31 मार्च व 3 एप्रिल 2024 रोजी देखील धावणार आहे. परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी (09058) दिनांक एक आणि चार एप्रिल 2024 रोजी सुद्धा धावणार आहे.

या स्थानकांवर थांबणार!

ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल या स्थानकांवर थांबणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment