उद्यापासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय डोजबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघाला पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरी येथे डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया ( संलग्न वर्ल्ड डॉजबॉल असोसिएशन) 17 वर्षाखालील राष्ट्रीय डॉजबॉल 2025 ची चँपियनशिप स्पर्धा दि.2  ते 6 मे 2025 रोजी होणार आहेत. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाला पालकमंत्री उदय समंत यांनी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशन तथा रत्नागिरी जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते  हस्ते डॉजबॉल संघास कीट वाटप करण्यात आले. यावेळी प्रत्येक खेळाडूंची विचारपूस करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा डॉजबॉल असो. अध्यक्ष श्री राजेश जाधव, सचिव उदयराज कळंबे आदी पदाधिकारी तसेच डॉजबॉल  खेळाडू उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment