मिरजमधील जैन धर्मीय पंचकल्याणक महा महोत्सवाला आ. शेखर निकम यांची भेट

Team RatnagiriLive
1 Min Read

सांगली:  दुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथे जैन धर्मीय पंचकल्याणक महामहोत्सव कार्यक्रमास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री शेखर निकम व सौ पूजा निकम यांनी आज भेट देऊन जैन मुनीमहाराजांचे शुभाशीर्वाद घेतले.

या प्रसंगी सकल जैन समाजातर्फे श्री सचिन कोल्हापुरे व सरिता कोल्हापुरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य श्री सुनितकुमार पाटील, सौ वैशाली पाटील, श्री व सौ दीपाराणी नितीन कोल्हापुरे पूजेचे यजमान श्री आप्पासाहेब पाटील,सौ पाटील व हजारो जैन श्रावक श्राविका सभामंडपात हजर होते.

यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे दुधगाव व परिसरातील अनेक माजी विद्यार्थी, संस्थेचे माजी शिक्षक, तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती यांचेसोबत प्राचीन जैन मंदिर तसेच ग्रामदैवत श्री दुधेश्वर मंदिर याचेही दर्शन घेतले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment