शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे १३ वे देहदान

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : कै.श्री.विजयकुमार वासुदेव आगाशे. वय – ८६ वर्षे, राहणार – बंदररोड,रत्नागिरी यांचे मंगळवार दिनांक – १८/११/२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कै.विजयकुमार आगाशे यांनी १९६२ ते १९९३ दरम्यान रत्नागिरी पोलिस दलामध्ये सेवा दिली. ते ASI म्हणून रत्नागिरी पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले. कै.आगाशे यांच्या व त्यांचे कुटुंबियांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे दिनांक १८/११/२०२५ रोजी करण्यात आले.
कै. श्री. आगाशे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
सदर मरणोत्तर देहदान वेळी श्री. आगाशे यांचे दोन्ही मुलगे श्री.प्रदिप आगाशे व श्री.सचिन आगाशे उपस्थित होते. तसेच श्री.सागर भिंगारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. देहदानाच्या सपूर्ण प्रकियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक
श्री. रेशम जाधव व शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर,भूमी पारकर, कर्मचारी मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर यांनी काम पाहिले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment