राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उलवे शहरतर्फे शिवजयंती उत्सवाचे आयोजन

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा,आदर्श कल्याणकारी राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी जयंती असून ही जयंती शिवजयंती म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उलवे शहर तर्फे गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेक्टर १९, उलवे, तालुका पनवेल येथे शिवजयंती उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सकाळी ८ वाजता भव्य ज्योत आगमन, सकाळी ११ वाजता मोफत आरोग्य शिबिर, दुपारी १२ वाजता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, सायंकाळी ४ वाजता हळदी कुंकू समारंभ, सायंकाळी ६ वाजता चित्रकला व निबंध स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता मान्यवराचे स्वागत व मनोगत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवभक्तांनी,शिवप्रेमींनी या शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उलवे शहराध्यक्ष संतोष काटे यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment