सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या ताफ्यात नवीन वाहने दाखल

Team RatnagiriLive
1 Min Read
  • मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) ना. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते हस्तांतरण सोहळा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचा हस्तांतरण सोहळा गुरुवारी १९ मार्च २०२६ रोजी झाला. पोलीस मुख्यालय येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी १० वाजता हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) ना. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून खासदार नारायण राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे व ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांना निमंत्रित करण्यात आले होते.त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर देखील उपस्थित होते.

जिल्हा पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सुसज्जता करण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामुळे पोलीस दलाची गती आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांनी हस्तांतर सोहळ्या प्रसंगी सांगितले.

TAGGED:
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment