ईद ए मिलादनिमित्त कोकणनगरमध्ये लहान मुलांची रॅली उत्साहात संपन्न

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी : ईद ए मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण येत्या दि. २९ सप्टेंबर रोज़ी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे फैजाने अत्तार कोकणनगर येथे लहान मुलांची रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. ही रॅली ही कोकणनगर परिसरामध्ये काढण्यात आली या वेळी दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे सदस्य उवेस जरीवाला, मौलाना अल्ताफ कुरेशी, अकील मेमन, नाझीम अहमद रजा तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment