सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान २३ रोजी रेल्वेचा अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’

Team RatnagiriLive
1 Min Read
  • मंगला एक्स्प्रेससह दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम


रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दिवशी मेगा ब्लॉक चालणार्‍या भागातून जाणार्‍या लांब पल्ल्याच्या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सावर्डे ते रत्नागिरी स्थानकादरम्यान दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 ते 9.30 या यावेळेत अडीच तास मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे एर्नाकुलम ते हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस (12617) ही दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी प्रवास होणारी दैनंदिन लांब पल्ल्याची गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान 1 तास 45 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.

याचबरोबर तिरुनेलवेली ते गाधीधाम दरम्यान धावणार (20923) ही 22 रोजी प्रवास सुरु होणारी आणि 23 फेब्रुवारीला मेगा ब्लॉक चालणार्‍या भागातून जाणारी गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान 1 तास 10 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment