कमर्शियल गॅस सिलिंडर १६ रुपये ५० पैशांनी महाग

Team RatnagiriLive
1 Min Read

घरगुती गॅसच्या किमती मात्र स्थिर

नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तत्काळ प्रभावाने वाढ केली आहे.

नवीन महिन्याच्या प्रारंभी म्हणजेच १ डिसेंबर २०२४ पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १६.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे तसेच ५ किलो फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरची किंमतही ४ रुपयांनी वाढली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत नोव्हेंबरमध्येही १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर ६२ रुपयांनी वाढवले होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment