चिपळूणमध्ये शालेय जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा उत्साहात संपन्न

Team RatnagiriLive
1 Min Read

चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा सिकई असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा 2023-24 दलवाई हायस्कूल मिरजोळी येथे जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा व आंतरराष्ट्रीय खेळाडू योगिता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात संपन्न झाल्या.


या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून बहुसंख्य शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उदघाट्न मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे चेअरमन खालिद दलवाई यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे सचिव जहीरभाई दलवाई शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष (प्राथ. विभाग )राजेश जाधव, माजी मुख्याध्यापक रामचंद्र महाडिक, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर सर, प्रशाळेचे मुख्याध्यापक रोहित जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते.


स्पर्धा संपन्नतेसाठी विनोद राऊत, हुजैफा ठाकूर, मंदार साळवी, प्रणित सावंत, स्वप्नाली पवार, गुफरान खान, गणेश राठोड, स्वानंद खेडेकर, स्नेहा रहाटे, सुरेश राठोड, मल्हार रजपूत, समरान घारे आदींनी पंच म्हणून काम पहिले. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक येणारे खेळाडू विभागीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हयाचे नेतृत्व करतील.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment