कोकण रेल्वे मार्गावर २६ ऑक्टोबरला ‘मेगा ब्लॉक’

Team RatnagiriLive
2 Min Read
  • जनशताब्दी एक्सप्रेससह नेत्रावती एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते संगमेश्वर तसेच मडगाव ते कुमटादरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मार्गावरील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान दि. 26 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत तर दुसरा मेगा ब्लॉक मडगाव ते कुमटा स्थानकादरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत घेण्यात येणार आहे.

चिपळूण संगमेश्वर दरम्यानच्या मेगा ब्लॉकचा परिणाम होणाऱ्या गाड्या

१) नागपूर ते मडगाव 01139 ही दिनांक 25 ऑक्टोबर रोजी प्रवास सुरू होणारी गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान शंभर मिनिटे रोखून ठेवली जाईल.

२) मुंबई सीएसएमटी ते मडगाव (12052) ही दिनांक 26 रोजी ची जनशताब्दी एक्सप्रेस कोल्हापूर चिपळूण दरम्यान 40 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.

३) तिरुअनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस (16346) ही दिनांक 25 ऑक्टोबर रोजी प्रवास सुरू होणारी गाडी दुसऱ्या दिवशी 26 रोजी रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान 40 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.

मडगाव ते कुमठा दरम्यानच्या मेगाब्लॉक चा परिणाम होणाऱ्या गाड्या

१) मंगळूर सेंट्रल ते मडगाव दरम्यान धावणारी 06602 ही दिनांक 26 रोजी ची गाडी कुमठा स्थानकात पर्यंत चालवली जाईल. रद्द केली जाईल.

२) मेगा ब्लॉकमुळे 06601 मडगाव ते मंगळूर दरम्यान धावणारी 26 ऑक्टोबरची विशेष गाडी आपला प्रवास कुमटा स्थानकावरून पुढे मंगळुरूच्या दिशेने सुरू करणार आहे. मडगाव ते कुमटा दरम्यान ही गाडी रद्द केली जाईल.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment