अभिनेते अशोक सराफ यांचा उलवे येथे होणार नागरी सत्कार
उरण, दि. ८ (विठ्ठल ममताबादे): मराठी चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय अभिनेता, 'पद्मश्री' पुरस्कारप्राप्त आणि विनोदी अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांचा उलवे येथे प्रथमच भव्य नागरी सत्कार होणार आहे. 'यमुनाबाई सामाजिक शैक्षणिक संस्था'…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान-रत्नागिरी जिल्ह्याची ताकद : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवन, रत्नागिरी येथे रविवारी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान कार्यशाळा उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. आजच्या विशेष कार्यक्रमात स्वच्छता, शिक्षण, ग्रामसभा…
कवींनो! कवितेची गाजलेली ओळ सद्यस्थितीतील अभिव्यक्तीत मांडा
चिपळूण : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने ने अभिनव स्वरुपाची ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थ ‘राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींना लेखनासाठी बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘गणपत वाणी’ या कवितेतील पहिलीच ओळ “गणपत वाणी बिडी पिताना” देण्यात आली आहे. आजवरच्या साहित्य इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच क्रियाशील प्रयोग असल्याने राज्यभरातील कवींमध्ये यास्पर्धेबाबत उत्सुकता आहे. एखाद्या सर्वज्ञात कविच्या गाजलेल्या कवितेची ओळ घेऊन त्याच्या मूळ कवितेपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीच्या अभिव्यक्तीची कविता निर्माण करून त्यातून सद्यस्थितीची विविधांगी मांडणी करणे आणि त्यातून चर्चित, अचर्चित समाज वास्तवाला भिडणे असे या संकल्पनेचे स्पर्धा स्वरूप आहे. “गणपत वाणी बिडी पिताना”ही ओळ स्पर्धेसाठी सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक कवितेत किमान एकदा तरी येणे अपेक्षित आहे. काव्यलेखक स्पर्धकाने कवितेच्या सुरुवातीला ही ओळ वापरणे अधिक कसदार मानण्यात येईल. या ओळीशिवाय या कवितेमधील इतर दुसऱ्या कोणत्याही ओळीवर किंवा मर्ढेकरांच्या इतर कवितेवर किंवा इतर कवीच्या कोणत्याची कवितेवर केलेले संस्करण स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. नवीन तयार होणाऱ्या कवितेतील अभिव्यक्ती मूळ कवितेपासून जितकी दूर जाईल तितकी ती यशाच्या अधिक जवळ जाईल, असा या संकल्पनेमागील विचार आहे. मूळ कवितेच्या ढाच्याला, आशयाला, शब्दांना आणि विषयाला या नव्या रचनेने अधिक कलासक्त वैचारिक बैठकीने कलाटणी द्यावी. वर्तमानाचे संदर्भ, नाविन्य, डौल, आशयाची घनता या गोष्टींचेही भान राखावे असा एकंदरीत विचार या स्पर्धेच्या आयोजनामागे आहे. या स्पर्धेसाठी मूळ कवितेचे विडंबन तसेच कोणत्याही अन्य प्रकारची कविता वरील मुद्द्यांच्या आधारे स्पर्धेस पात्र राहिल. या स्पर्धेसाठी अपेक्षित काव्य अभिव्यक्ती कशाप्रकारे साकार होईल, याची काही…
लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान विशेष ट्रेन!
रत्नागिरी : दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि सावंतवाडी रोड दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा (Weekly Special Train) सुरू करण्याची घोषणा…
कोकण रेल्वे मार्गावर दसरा- दिवाळीसाठी विशेष ट्रेन धावणार!
रत्नागिरी : मुंबईहून केरळला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते तिरुवनंतपुरम उत्तर (TVN) पर्यंत २० विशेष साप्ताहिक सेवा जाहीर केल्या आहेत. या विशेष…
रत्नागिरीत ईद ए मिलाद उत्साहात साजरी ; शहरात भव्य जुलूस
रत्नागिरी: इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा १५०० वा जन्मदिवस रत्नागिरी शहरात 'ईद ए मिलाद' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगलमय प्रसंगाचे औचित्य साधून दावते इस्लामी रत्नागिरी…
फाटक हायस्कूलचे शिक्षक इंद्रसिंग वळवी, शिल्परेखा जोशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
रत्नागिरी : शहरातील फाटक हायस्कूल येथील इंद्रसिंग वळवी तसेच शिल्परेखा जोशी या दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रोटरी क्लबमार्फत दरवर्षी रत्नागिरीतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात…
भक्ती मयेकर खून प्रकरणी संशयित दुर्वास पाटीलच्या वडिलांना पोलिसांनी घेतले चौकशीसाठी ताब्यात
रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणी भक्ती मयेकर खून प्रकरण आता एका वेगळ्या दिशेने वळले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी दुर्वास पाटील याच्या वडिलांना पोलिसांनी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले…
मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली बाजारपेठेतील सर्व्हिस रोड अपूर्ण; प्रवाशांची गैरसोय
रत्नागिरी: मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे (NH 66 ) काम वेगाने सुरू असताना, रत्नागिरी जिल्ह्यातील अरवली बाजारपेठेतील दुसऱ्या बाजूचा सर्विस रोड (Service Road) अजूनही अपूर्णच आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे…
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतले नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी बाप्पाचे दर्शन!
पुणे: राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतेच पुण्यात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची मनोभावे पूजा करून आशीर्वाद…
